कोल्हापूरमधील सार्वजनिक तसेच समाजप्रबोधन गणेशोत्सवाची सुरवात करणाऱ्या मंडळांपैकी एक म्हणजे रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ,रंकाळा स्थानक चौक,कोल्हापूर.


रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळाची स्थापना सन १९७८ मध्ये झाली.हे छायाचित्र गणेशोस्तव स्वागत कमान, सन १९७८ रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ,रंकाळा स्थानक चौक,कोल्हापूर.

रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळाने स्थापनेपासूनच समाजप्रबोधनाला सुरवात केली आहे तसेच पूर्वीपासून मंडळाने हालता तांत्रिक देखावा व त्यातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा देखील जपली आहे.


हे छायाचित्र हालता,तांत्रिक देखावा तब्बल ३५ वर्षाहून जुने.

मुंबईच्या लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीचे दर्शन पश्चिम महाराष्ट्र,कोकण व गोव्यातील भाविकांना घेता यावे म्हणून ३ वर्षाच्या प्रयत्नानंतर २०१४ सालपासून रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळाने लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिकृती कोल्हापूरचा राजा या नावाने बाप्पाची मूर्ती बसविण्यास सुरवात केली.


प्रस्तुत छायाचित्र मुंबई येथे बनविलेली लालबागच्या राजाची प्रतिकृती. ही मूर्ती सिहासनारूढ असून मूर्तीची उंची अंदाजे १३ फुट आणि रुंदी अंदाजे ८ फुट आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण मूर्ती शाडूमध्ये तयार केली जाते.

  • रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ,रंकाळा स्थानक चौक,कोल्हापूर,४१६०१२.


Developed By :Revolution IT Solutions