गोल सर्कल मित्र मंडळ,कोल्हापूर
मेडीकल चेकअप कॅम्प- शालेय विद्यार्थ्यांनासाठी ब्लड ग्रुप चेकअप कॅम्प ची आयोजन. डॉ.प्रदीप पोवार व डॉ. संतोष चौगले यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
दुष्काळग्रस्तांसाठी मा. मुख्यमंत्री निधीकडे मदत जमा करताना कोल्हापूरच्या राजाचे कार्यकर्ते. सदर्निधी मा. श्री. बरगे साहेब(निवासी उपजिल्हाधिकारी) यांच्या कडे सुपूर्त केले.
स्वाईन फ्लू प्रतिबंधक होमिओपॅथी लसीकरण कॅम्प पूर्णपणे मोफत करण्यात आले. अबल्वृधानसह अंदाजे ५००० लसीचे वापट डॉ.संदीप शेटे , डॉ. प्रदीप पोवार यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
बेटी बचाओ जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा परिषद व मा.जिल्हाधिकारी यांच्या बेटी बचाओ उपक्रमास लोकांपर्यंत पोह्चवण्यामध्ये मंडळाचे योगदान ५००० माहिती पत्रकांचे गणेशोत्सव काळात वाटप.
करवीर राज्य सौस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याची स्वच्छते मध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
पद्मश्री मा. प्रतापसिंह जाधव-संपादक दै.पुढारी व महापौर वैशाली डकरे यांच्या हस्ते केळी गाडीचालक श्री.भरत भोईर यांचा एकुलता एक मुलगा चि.रोहित भरत भोईर हा जन्मताच अपंग असून याच्या ऑपरेशनसाठी कोल्हापूरच्या राजा कडून ११००० रु. ची भरगोस मदत मिळाली.
मातोश्री वृद्धाश्रम,कोल्हापूर येथे मंडळाने धान्य वाटप केले.
कोल्हापूर महानगरपालिका रक्तपेढी यांच्या अहवालानुसार मंडळाच्या ५० कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
श्री रेणुका मंदीर येथील गरीब कुष्ठरोगींना फळे वाटप करण्यात आले. तसेच मंडळाच्या परिसरातील विकास विद्यामंदिर येथील अंध विद्यार्थ्यांना जेवणाची तात वाटी प्रदान करण्यात आली.
कु. डिंपल कराळे वय वर्ष ३ ही जन्मताच कर्णबधीर असून घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे श्रवण यंत्र घेऊ शकत नव्हती. कोल्हापूरच्या राजाच्या आशीर्वादाने मंडळाने तब्बल १६ हजाराची भरगोस मदत तिला देऊ केली.
आरोग्यविषयक जनजागृतीसाठी गणेशोस्तव काळात मंडळाने डॉ. महेंद्र देशमाने यांचे बहुमोल सहकार्याने पूर्णपणे मोफत डायबेटीस चेकअप कॅम्प आयोजित केला होता.